अर्थ : नाटकाचा एक भाग.
उदाहरणे :
हे नाटक तीन अंकी आहे
अर्थ : नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग.
उदाहरणे :
हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
अर्थ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
उदाहरणे :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
समानार्थी : आकडा
अर्थ : बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भाग.
उदाहरणे :
मूल आईच्या मांडीवर झोपी गेले
समानार्थी : मांडी