अर्थ : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
उदाहरणे :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
अर्थ : लोखंडाची सरळ वा वाकलेली खीळ.
उदाहरणे :
तो खेळणी बनवायला काट्याचा वापर करतो.
अर्थ : माशाच्या शरीरातील हाड.
उदाहरणे :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
अर्थ : नाण्याच्या ज्या बाजूला त्याच्या किंमतीचा आकडा असतो ती बाजू.
उदाहरणे :
काटा की छापा ते सांग.
अर्थ : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
उदाहरणे :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
समानार्थी : वजनकाटा
अर्थ : अणकुचीदार, लांब असा, विशिष्ट प्रमाण दाखवणारा मापण्याच्या साधनाचा एक भाग.
उदाहरणे :
कंपासातीस काटा उत्तर व दक्षिण ही दिशा दाखवतो.
समानार्थी : दर्शक
अर्थ : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.
उदाहरणे :
विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.
समानार्थी : नांगी
अर्थ : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
उदाहरणे :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
अर्थ : त्रिशुळासारखी अणकुचीदार पाती असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा चमचा.
उदाहरणे :
काट्याने सर्वांना खायला जमत नाही.
अर्थ : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
उदाहरणे :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.