अर्थ : कापड मोजण्याची लोखंडी किंवा लाकडी पट्टी.
उदाहरणे :
दुकानदाराने गजाने कापड मापले
अर्थ : बंदुकीत दारू ठासण्याची लोखंडी सळई.
उदाहरणे :
ठासणीच्या बंदुकीत त्याने गजाने दारू ठासली.
अर्थ : सारंगी इत्यादी तंतुवाद्ये वाजवण्याची, घोड्याचे केस लावलेली, वाकवलेली काठी.
उदाहरणे :
व्हायोलिनचा गज दुरुस्तीसाठी दिला आहे.
अर्थ : बदकापेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
सोनुला उदी व करड्या रंगाचा असतो.
समानार्थी : गजरो, मळीण बाड्डा, सोनुला
अर्थ : धातूचा लांब आणि दंडगोलाकार तुकडा.
उदाहरणे :
इथे ठेवलेल्या गजाला गंज लागला आहे.
समानार्थी : सळई