अर्थ : जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा कमीमध्ये निर्वाह करणे.
उदाहरणे :
कमी पैशात तिने कसेबसे भागवले.
समानार्थी : भागवणे
अर्थ : चालायला लावणे.
उदाहरणे :
त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
अर्थ : चालणे शक्य असणे.
उदाहरणे :
मला इतके अंतर कसे चालवेल?
अर्थ : एखादे कारभार चालू ठेवणे.
उदाहरणे :
तो मुंबईत एक दुकान चालवतो.
अर्थ : असे काही करणे ज्यामुळे एखादी वस्तू इत्यादी काम करेल.
उदाहरणे :
तो शिलाई मशीन चालवित आहे.
समानार्थी : चालविणे