अर्थ : एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्या वस्तूंना व्यवस्थित लावणे.
उदाहरणे :
सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
अर्थ : एखादी वस्तू जाळण्यासाठी विस्तवात फेकणे.
उदाहरणे :
जेवण बनवताना सीता एकसारखी वाळक्या काड्या चुलीत टाकत होती.
अर्थ : एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे.
उदाहरणे :
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका.
डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
समानार्थी : ठेवणे
अर्थ : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
उदाहरणे :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
समानार्थी : सोडणे
अर्थ : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
उदाहरणे :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
समानार्थी : घेणे
अर्थ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
उदाहरणे :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
समानार्थी : ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे, हवाली करणे
अर्थ : अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे.
उदाहरणे :
हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.
समानार्थी : फेकणे
अर्थ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
उदाहरणे :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
समानार्थी : पाडणे