अर्थ : एखादे स्थान, घर इत्यादीच्या आत ठेवणे.
उदाहरणे :
येथे आजारी प्राण्यांना ठेवले जाते.
अर्थ : एखाद्या विशेष उद्देश्यासाठी किंवा उपयोगासाठी वेगळे ठेवणे.
उदाहरणे :
हे सामान पूजेसाठी ठेवले आहे.
अर्थ : एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे.
उदाहरणे :
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका.
डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
समानार्थी : टाकणे
अर्थ : राखून ठेवणे वा वाचविणे.
उदाहरणे :
तुझ्यासाठी एक बर्फीचा तुकडा ठेवला आहे.
अर्थ : एखाद्या स्त्रीला तिच्याशी लग्न न करता पत्नी म्हणून बाळगणे.
उदाहरणे :
त्याने एका सुंदर स्त्रीला आपल्या घरी ठेवले आहे.
अर्थ : शिजण्यासाठी चुलीवर वा गॅसवर ठेवणे.
उदाहरणे :
गॅसवर डाळ ठेवली आहे.
भात लावला आहे.
समानार्थी : लावणे
अर्थ : एखादी गोष्ट आपल्या ताब्यात घेऊन ती आपल्याजवळ सुरक्षित ठेवणे.
उदाहरणे :
त्याचे दागिने मी माझ्यापाशी ठेवले.
अर्थ : एखाद्या गोष्टीला एखाद्या जागेवर टेकवणे.
उदाहरणे :
त्याने कपाटात पुस्तके ठेवली
अर्थ : कामावर वा नोकरीवर घेणे.
उदाहरणे :
या कामासाठी आम्ही नुकतीच पाच माणसे नेमली
समानार्थी : नियुक्त करणे, नेमणे
अर्थ : एखाद्या निश्चित किंवा विशेष स्थिती इत्यादीत ठेवणे.
उदाहरणे :
खोली स्वच्छ ठेवा.
ती स्वतःला नेहमी व्यस्त ठेवते.