अर्थ : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
उदाहरणे :
हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
समानार्थी : साम्राज्य
अर्थ : स्वायत्त राज्य सरकारात समाविष्ट असणारा व त्यासाठी कार्य करणारा लोकांचा गट.
उदाहरणे :
राज्याने ह्यावर्षी आयकर वाढविला आहे.
अर्थ : राजा किंवा राणीच्या अधिपत्याखाली असलेली शासनव्यवस्था.
उदाहरणे :
अनावृष्टीमुळे राज्याने शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.
अर्थ : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.
उदाहरणे :
पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.
समानार्थी : प्रदेश