अर्थ : सामान्य धर्म अथवा स्वरूप असणार्या गोष्टींचा समूह.
उदाहरणे :
व्याकरणातील धातू आणि नामिक हे वर्ग त्या शब्दांना लागणार्या प्रत्ययांवरून केले आहेत
समानार्थी : गट
अर्थ : मुले बसून अभ्यास करतात ती शाळेतील एक खोली.
उदाहरणे :
आमच्या वर्गात तीस मुले आहेत
अर्थ : एखाद्या अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
कुठल्या इयत्तेत शिकतो.
समानार्थी : इयत्ता
अर्थ : गुण्यांक व गुणकांक एकच कल्पून गुणले असता होणारी संख्या.
उदाहरणे :
आठाचा वर्ग चौसष्ट होतो.
अर्थ : वर्णांचा समुदाय.
उदाहरणे :
व्यंजनांना कवर्ग,चवर्ग,टवर्ग इत्यादी वर्गात विभागता येते.
अर्थ : वर्गातील सर्व विद्यार्थी.
उदाहरणे :
सकाळ्या तासात पूर्ण वर्ग झोपा काढत होता.
अर्थ : स्थानिक क्षेत्रात राहणारा लोकांचा समूह.
उदाहरणे :
समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
समानार्थी : समाज
अर्थ : एकत्रपणे पदवी शिक्षण घेतलेला किंवा घेत असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग.
उदाहरणे :
श्यामा विद्यापीठात माझ्याच वर्गात होती.