अर्थ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
उदाहरणे :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
समानार्थी : अवधी, कालमर्यादा, मुदत, मुद्दत
अर्थ : जेवायचा किंवा जेवण घेण्याचा एक निश्चित समय.
उदाहरणे :
आज देखील आपल्या देशात गरीबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही.
अर्थ : वारंवारता दर्शविताना वा मोजताना वापरला जाणारा एकक.
उदाहरणे :
त्याने खूप वेळा मला दूरध्वनी केला.
अर्थ : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
समानार्थी : काळ
अर्थ : एखाद्याच्या नियंत्रणात असलेला कालावधी.
उदाहरणे :
माझ्याकडे खायला वेळ नाही