अर्थ : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.
उदाहरणे :
अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
समानार्थी : तपास
अर्थ : एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे.
उदाहरणे :
राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला
अर्थ : एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया.
उदाहरणे :
कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला.