अर्थ : बंधनातून मोकळे करणे.
उदाहरणे :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
समानार्थी : मुक्त करणे, सुटका करणे
अर्थ : प्रवाहाच्या उताराच्या दिशेने घेऊन जाणे.
उदाहरणे :
धरणाचे पाणी कालव्यात सोडले जाते.
अर्थ : एखाद्यास आपल्याबरोबर न ठेवणे.
उदाहरणे :
त्याने मला जत्रेत सोडून दिले.
अर्थ : एखाद्या मोजणीतून वगळणे.
उदाहरणे :
पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
समानार्थी : वगळणे
अर्थ : पाण्याच्या प्रवाहात सोडणे.
उदाहरणे :
त्याने आपल्या आजोबांच्या अस्थी नदीत सोडल्या.
समानार्थी : विसर्जित करणे
अर्थ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
उदाहरणे :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
समानार्थी : फुटणे, बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे
अर्थ : गाठ, बंध इत्यादी मोकळे करणे.
उदाहरणे :
स्वेटरच्या गुंड्या सोडल्या.
अर्थ : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
उदाहरणे :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
समानार्थी : पाठीमागे लावणे, मागे लावणे
अर्थ : असलेल्या स्थानावरून निघणे.
उदाहरणे :
गाडीने दहा वाजता फलाट सोडले.
अर्थ : कार्यवाही न करणे.
उदाहरणे :
मी तिसरा प्रश्न सोडला.
अर्थ : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
उदाहरणे :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
समानार्थी : टाकणे
अर्थ : उपास संपल्यावर खायची वस्तू तोंडात घालणे.
उदाहरणे :
हरताळकेचा उपास बेलपान चाटून सोडतात.
अर्थ : एखाद्याचा दोष सिद्ध न झाल्यामुळे त्याला मुक्त करणे.
उदाहरणे :
न्यायाधीशाने मोहनला दोषमुक्त केले.
समानार्थी : दोषमुक्त करणे
अर्थ : अस्त्र इत्यादी चालवणे.
उदाहरणे :
रामाने रावणावर अस्त्र सोडला.