अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरण :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
पर्यायवाची : उडवणे, उडविणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
अर्थ : घाबरेला घोडा, बैल इत्यादींचे अनावर होणे.
उदाहरण :
घोडा मोकळा सुटला की सारखा उधळतो.
अर्थ : व्यर्थ खर्च करणे.
उदाहरण :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
पर्यायवाची : उडवणे, उधळपट्टी करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।