शेतकरी (नाम)
शेती करणारा मनुष्य.
स्नेहसंबंध (नाम)
वारंवार भेटण्यामुळे निर्माण होणारा आपापपसातला संबंध.
स्वयंसेवक (नाम)
आपल्या इच्छेने सेवकभावाने लोककार्य करणारी व्यक्ती.
गोफण (नाम)
दोरी, रबर, चामडे इत्यादींपासून बनविलेले, दगड-गोटे मारण्यासाठीचे विशेष प्रकारचे साधन.
विरागी (विशेषण)
आसक्त्त नसलेला.
थाप (नाम)
पखवाज,तबला इत्यादीवर त्यातून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार.
चावा (नाम)
विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
बुद्धी (नाम)
पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती.
ताट (नाम)
जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
धनुष्य (नाम)
लवचीक काठीला बाक देऊन तिची दोन्ही टोके दोरीने जोडून केलेले बाण सोडण्याचे साधन.