सावली (नाम)
एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
प्रवेश (नाम)
विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
गोधडी (नाम)
जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.
ससाणा (नाम)
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
लेखक (नाम)
कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.
मीठ (नाम)
खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..
बेअब्रू (नाम)
एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
बुडी (नाम)
काही वेळ पाण्याखाली जाणीवपूर्वक राहण्याची क्रिया.
सोंगटी (नाम)
बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
छाया (नाम)
एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.