निरोप्या (नाम)
एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
जळते लाकूड (नाम)
जळत असलेले लाकूड.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
बीळ (नाम)
उंदीर, घूस, साप इत्यादींचे राहण्याचे ठिकाण.
ब्रह्मचारी (नाम)
स्त्रीसंगपरित्यागाचे व्रत आजन्म किंवा काही काळपर्यंत पाळणारा मनुष्य.
अग्रेसर (विशेषण)
पुढे गेलेला, प्रगती झालेला.
नंदीबैल (नाम)
संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
काळोखी रात्र (नाम)
चंद्राचादेखील प्रकाश नाही अशी काळोख असलेली रात्र.
लोचट (विशेषण)
ज्याला लाज नाही तो.
भुयार (नाम)
जमिनीखालून जाणारा मार्ग.