अर्थ : वाहन इत्यादींवर चढणे.
उदाहरण :
तो घोड्यावर आरूढ झाला.
पर्यायवाची : आरूढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कहीं जाने के लिए किसी चीज, जानवर, सवारी आदि के ऊपर बैठना या स्थित होना।
रजत बस पर चढ़ा।अर्थ : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
उदाहरण :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
पर्यायवाची : लागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट दुसरीच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बसणे.
उदाहरण :
दागिन्यांवर सोन्याचे पाणी चांगले चढले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वर असलेल्या ठिकाणावर जाणे.
उदाहरण :
ती चौथर्यावर चढली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आवाज तीव्र होणे.
उदाहरण :
त्या गायिकेचा आवाज सहज चढतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गर्वाने ताठणे.
उदाहरण :
नोकरी लागल्यापासून तो फार चढला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अभिमान से भर जाना।
उसकी थोड़ी बड़ाई हुई और वह चढ़ गया।अर्थ : किंमत वाढणे.
उदाहरण :
सोन्याचा भाव चढला आहे.
पर्यायवाची : महागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
दाम या भाव बढ़ना।
दिन-प्रतिदिन वस्तुओं के भाव बढ़ रहे हैं।अर्थ : देव, देवता इत्यादीस भेट म्हणून मिळणे.
उदाहरण :
कालीमातेच्या मंदिरात खूप वस्तू चढल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के द्वारा श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर कुछ रखा जाना।
काली मंदिर में बहुत चढ़ावा चढ़ता है।