शक्कल (नाम)
इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
दाट (विशेषण)
ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
विपर्यास (नाम)
उलट अर्थ घेण्याची क्रिया.
व्याकूळ (विशेषण)
शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
शंका (नाम)
एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती.
उशीर (नाम)
ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
रुची (नाम)
स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
अनिश्चितता (नाम)
एखादी गोष्ट निश्चित नसण्याची अवस्था.