पलटण (नाम)
पायदळाचा एक भाग.
ऊस (नाम)
साखर, गूळ इत्यादी ज्याच्या रसापासून तयार होतात अशी वनस्पती.
विषम (नाम)
संगीतातील तालाचा एक प्रकार.
शेपू (नाम)
एक छोटे रोप ज्याचा एक पालेभाजी म्हणून उपयोग होतो.
तुकडी (नाम)
गणवेशधारी सैनिक, शिपायांचा लहान गट.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
वयस्कर (नाम)
बाल्यावस्था पूर्ण करून तरुणदशा प्राप्त झालेली व्यक्ती.
भाकरी (नाम)
जोंधळा, बाजरी इत्यादीच्या पिठाचे हाताने थापून भाजून केलेले खाद्य.
काळोखी रात्र (नाम)
चंद्राचादेखील प्रकाश नाही अशी काळोख असलेली रात्र.
प्रवाह (नाम)
जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.