अर्थ : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.
उदाहरण :
भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
पर्यायवाची : उरणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे
अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे.
उदाहरण :
येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विशेष अवस्था में होना या किसी विशेष अवस्था का होना।
यहाँ मौसम अधिकतर एक जैसा रहता है।अर्थ : कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.
उदाहरण :
दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
पर्यायवाची : मुक्काम करणे, वस्ती करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.
उदाहरण :
चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे.
उदाहरण :
हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
पर्यायवाची : बाकी असणे, शिल्लक असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
उदाहरण :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
पर्यायवाची : टिकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
उदाहरण :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
पर्यायवाची : सुटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे.
उदाहरण :
या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
पर्यायवाची : मावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या ठिकाणी वास करणे.
उदाहरण :
माझे वडील गावी राहतात.
पर्यायवाची : असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वंचित होणे.
उदाहरण :
संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
पर्यायवाची : राहून जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :