अर्थ : विशिष्ट ठिकाणच्या नेहमीच्या कामकाजाची सुरुवात होणे.
उदाहरणे :
आमचे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडते
अर्थ : एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे.
उदाहरणे :
घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.
अर्थ : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.
उदाहरणे :
काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.
समानार्थी : उघड करणे, उघडकीस आणले, बाहेर काढणे
अर्थ : बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे.
उदाहरणे :
आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.
अर्थ : कालवा, वाट इत्यादी लोकांच्या वापरासाठी खुली करणे.
उदाहरणे :
दहा दिवसानंतर कालवा उघडणार.
अर्थ : अडसर निघून मोकळे होणे.
उदाहरणे :
एकाएकी समोरचे दार उघडले
अर्थ : झाकण, अडसर इत्यादी काढून मोकळे करणे.
उदाहरणे :
तिने लगबगीने दार उघडले
अर्थ : संगणकात एखादी फाईल इत्यादी उघडणे.
उदाहरणे :
सुरवातीला तुम्ही एक फाईल उघडा.