सांझा करें ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतरणे (क्रियापद)

१. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : प्रमाण कमी होणे.

उदाहरणे : तीन दिवसांनी पुराचे पाणी ओसरले.

समानार्थी : ओसरणे

२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : खाद्य पदार्थ नासायला सुरवात होणे.

उदाहरणे : जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.

३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे.

उदाहरणे : चुलीवरचे भांडे उतर

समानार्थी : उतरवणे

ऊपर से नीचे की ओर लाना।

मोहन ट्रक से सामान उतार रहा है।
अवतारना, उतारना

Move something or somebody to a lower position.

Take down the vase from the shelf.
bring down, get down, let down, lower, take down
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : प्रभाव कमी करणे.

उदाहरणे : तो मनुष्य औषध देऊन कावीळ उतरवतो.

समानार्थी : उतरवणे

५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.

उदाहरणे : एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.

समानार्थी : उतरवणे, काढणे

पहनी हुई वस्तु को अलग करना।

बच्चे ने स्नान करने के लिए अपने कपड़े उतारे।
उतारना, खोलना, निकालना

Remove (someone's or one's own) clothes.

The nurse quickly undressed the accident victim.
She divested herself of her outdoor clothes.
He disinvested himself of his garments.
disinvest, divest, strip, undress
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.

उदाहरणे : मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.

समानार्थी : उतरवणे

७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या उच्च स्तर किंवा स्थितीतून आपल्या खालच्या किंवा सामान्य किंवा स्वाभाविक स्तर किंवा स्थिती इत्यादीत येणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव नाहीसा होणे.

उदाहरणे : आज सकाळीच ह्याचा ताप उतरला.
कित्येक तासाने मनोजची दारू उतरली.

उतर जाना या न रहना या किसी उच्च स्तर या स्थिति से अपने नीचे वाले सामान्य या स्वाभाविक स्तर, स्थिति आदि की ओर आना।

आज सुबह ही इसका बुखार टूटा।
घंटों बाद मनोज का नशा टूटा।
उतरना, टूटना

Wear off or die down.

The pain subsided.
lessen, subside
८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : करायला लागणे किंवा सुरवात करण्यासाठी आपली सहमती दर्शविणे.

उदाहरणे : तो छोट्याश्या गोष्टीला धरून मारामारीवर उतरला.

कुछ करने लगना, या शुरू करने के लिए अपनी सहमति दिखा देना।

वह छोटी सी बात को लेकर मारपीट पर उतर आया।
उतर आना
९. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.

उदाहरणे : ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.

समानार्थी : कोमजणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे

कांति का मलिन पड़ना।

बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।
उतरना, कुम्हलाना, मुरझाना, मुर्झाना, म्लान होना

Lose freshness, vigor, or vitality.

Her bloom was fading.
fade, wither
१०. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे पद किंवा स्थानावरून घसरून किंवा पडून किंवा इतर प्रकारे वेगळे होऊन खाली येणे.

उदाहरणे : तो आपल्या दुर्वर्तनाने माझ्या मनातून उतरला.

किसी पद या स्थान से खिंच, खिसक या गिरकर अथवा किसी अन्य प्रकार से अलग होकर नीचे आना।

बकरे की खाल उतर गई है।
वह अपने दुर्व्यवहार के कारण मेरे चित्त पर से उतरा है।
उतरना
११. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे.

उदाहरणे : आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.

समानार्थी : थांबणे, राहणे

कहीं आश्रय लेना।

हम जब भी दिल्ली जाते हैं, शर्माजी के यहाँ रुकते हैं।
उतरना, टिकना, ठहरना, रहना, रुकना
१२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : किंमत किंवा भाव कमी होणे.

उदाहरणे : हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.

समानार्थी : खाली येणे, घटणे, पडणे

भाव का गिर जाना या कम हो जाना।

आजकल सोने का भाव उतर गया है।
उतरना, गिरना, घटना, लुढ़कना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
१३. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या प्रकारचा आवेश मंद होऊन तो शांत किंवा समाप्त होणे.

उदाहरणे : वडिलांचा राग अजून उतरला नाही.

किसी प्रकार के आवेश का मंद पड़कर शांत या समाप्त होना।

पिताजी का गुस्सा अभी तक नहीं उतरा।
बुढ़ापे में भी उनकी पढ़ने की सनक नहीं उतरी।
उतरना
१४. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे.

उदाहरणे : श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली

समानार्थी : उतरवणे, काढणे

दाढ़ी या बाल कटवाना या पूरी तरह से निकलवा देना।

मैंने नाई से दाढ़ी बनवाई।
बनवाना
१५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वाहनातून बाहेर येणे किंवा वाहनावरून जमिनीवर येणे.

उदाहरणे : आम्ही रात्री दहा वाजता फलाटावर उतरलो.

सवारी आदि से बाहर निकलना या वाहन से जमीन पर आना।

वह बस से धीरे-धीरे उतरा।
ट्रक से माल उतरा।
उतरना
१६. क्रियापद / घडणे

अर्थ : फळे, फुले इत्यादी नासायला सुरवात होणे.

उदाहरणे : जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.

फलों, फूलों आदि का अच्छी तरह से पक या फूल चुकने के बाद सड़न की ओर प्रवृत्त होना।

कल तक यह आम उतर जायगा।
सब्जी उतर रही है।
उतरना
१७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : वरून खालच्या दिशेला येणे.

उदाहरणे : आजी हळूहळू पायर्‍या उतरली.

किसी व्यक्ति या वस्तु का ऊँचे स्थान से नीचे की ओर आना या जाना।

दादी धीरे-धीरे सीढ़ियों से उतरती हैं।
अवतरण करना, अवरोहना, उतरना

Come down.

The birds alighted.
alight, climb down
१८. क्रियापद / घडणे

अर्थ : कर्ज इत्यादीतून मुक्त होणे.

उदाहरणे : माझे बँकेचे कर्ज फिटले.

समानार्थी : फिटणे

ऋण या देन का चुकता हो जाना या पाई-पाई अदा हो जाना।

मेरा बैंक का कर्ज पट गया।
चुकना, पटना, भुगतना

Pay back.

Please refund me my money.
give back, refund, repay, return
१९. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पत्त्यांच्या खेळात पान टाकणे.

उदाहरणे : त्याने हुकमाचा एक्का उतरला.

ताश के खेल में पत्ता फेंकना।

उसने हुकुम का पत्ता फेंका।
पत्ता गिरना, पत्ता फेंकना
२०. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम, व्यवसाय इत्यादी सुरू करणे किंवा एखाद्या विशेष कार्यक्षेत्रात पदार्पण करणे.

उदाहरणे : भांडवलदार हल्ली बँकिंग कारभारातदेखील उतरत आहेत.

कोई काम, व्यवसाय आदि शुरू करना या किसी विशेष कार्य-क्षेत्र में पदार्पण करना।

पूँजीपति आजकल बैंकिंग कारोबार में भी उतर रहे हैं।
आना, उतरना

उतरणे (नाम)

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमी होण्याची क्रिया.

उदाहरणे : पुराचे पाणी उतरल्याने लोकांना बरे वाटले.

घटने या कम होने की क्रिया या भाव।

बाढ़ग्रस्त ग्रामीणों को नदी के पानी का अवतरण देख थोड़ी राहत मिली।
अवतरण, उतरना, उतराई, उतराव, घटना

Change toward something smaller or lower.

decline, diminution
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.

उदाहरणे : विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.

समानार्थी : अवतरण, खाली येणे

वायुयान या अन्य वस्तुओं का किसी सतह पर उतरने की क्रिया।

बच्चे घर की छत से हवाई जहाज़ का अवतरण देख रहे हैं।
अवतरण, अवतार, उतरना, उतराई

The act of coming down to the earth (or other surface).

The plane made a smooth landing.
His landing on his feet was catlike.
landing