अर्थ : संभोग करण्याची इच्छा.
उदाहरणे :
ब्रह्मचर्य पाळण्यासाठी कामावर विजय मिळवावा लागतो.
समानार्थी : मदनविकार, संभोगेच्छा
अर्थ : इंद्रियांची विषयासक्ती.
उदाहरणे :
कामाचा म्हणजे मोहाचा नाश ही राजाच्या विजयाची पहिली पायरी असते.
अर्थ : एखादी वस्तू किंवा व्यक्तीचे कष्ट, कार्य इत्यादींपासून निर्माण झालेले उत्पादन.
उदाहरणे :
तुझे काम खूपच छान आहे.
मी तुम्हाला माझे सर्वाच चांगले काम दाखवत आहे.