नौका (नाम)
लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
इंद्र (नाम)
देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
चिन्ह (नाम)
जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
हाकलणे (क्रियापद)
पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे.
बाजूबंद (नाम)
दंडाला बांधायचा एक दागिना.
ढोली (नाम)
झाडाचे खोड, फांद्या इत्यादीमध्ये तयार झालेला पोकळ भाग.
उत्तराधिकारी (नाम)
एखाद्या पदावर त्याच्या सध्याच्या अधिकार्यानंतर येणारा अधिकारी.
डच्चू (नाम)
शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
यजमानीण (नाम)
यज्ञकर्म करणार्याची (यजमानाची) पत्नी.
बांबू (नाम)
लांब व सरळ दांडा असलेली उष्णकटिबंधीय वनस्पती.