अर्थ : समावेशासाठीचा अवकाश.
उदाहरणे :
सभागृह इतके भरले होते की मुंगीलाही शिरायला वाव नव्हता
समानार्थी : वाव
अर्थ : निश्चित अथवा निर्देशित स्थान.
उदाहरणे :
घरात एकही गोष्ट आपल्या जागेवर नाही आहे.
समानार्थी : ठिकाण
अर्थ : उपयोगासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश्यासाठी निर्धारित असलेली जागा.
उदाहरणे :
ह्या विश्वविद्यालयात पीएचडीसाठी खूप कमी जागा आहेत.
समानार्थी : सीट
अर्थ : राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते.
उदाहरणे :
ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
अर्थ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
उदाहरणे :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
समानार्थी : जागृत