अर्थ : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
उदाहरणे :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
समानार्थी : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, मधुसुदन, माधव, रमाकांत, रमानाथ, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
अर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
नारायणोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.
समानार्थी : नारायणउपनिषद, नारायणोपनिषद
अर्थ : एक पौराणिक ऋषी ज्यांनी ऋग्वेदातीस पुरूष सूक्ताची रचना केली.
उदाहरणे :
एका कथेनुसार असे म्हटले जाते की नारायणाने आपल्या ऊरातून उर्वशीची निर्मिती केली होती.
समानार्थी : नारायण ऋषी