अर्थ : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
समानार्थी : पार्टी
अर्थ : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
उदाहरणे :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
समानार्थी : पार्टी
अर्थ : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
उदाहरणे :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
समानार्थी : पार्टी
अर्थ : चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
समानार्थी : पंधरवडा
अर्थ : माशाचे पंख.
उदाहरणे :
पक्ष माशाला पोहण्यात मदत करतात
अर्थ : एखादी गोष्ट, काम इत्यादीचे समर्थन.
उदाहरणे :
मी हे काम करण्याच्या पक्षात नाही.
समानार्थी : बाजू