पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वजनाने अधिक असलेला.

उदाहरणे : सर्व जड सामान हमालाने उचलले

समानार्थी : अवजड, जड, बोजड, वजनदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें या जिसका अधिक भार या बोझ हो।

भारी समान मत उठाओ।
पीवर, बोझल, बोझिल, बोझैल, भारी, वजनदार, वजनी, वज़नी
२. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.

उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

समानार्थी : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मात्रा में ज़्यादा हो।

उसके पास बहुत सम्पत्ति है।
वह अगाध संपत्ति का मालिक है।
अति, अतीव, अधिक, अनल्प, अनून, अन्यून, अबेश, आकर, आत्यंतिक, आत्यन्तिक, काफ़ी, काफी, ख़ूब, खूब, गहरा, ज़्यादा, ज्यादा, बहुत, बहुल
३. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

उदाहरणे : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

समानार्थी : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न झेपणारा.

उदाहरणे : हे काम मला भारी पडले.

५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.

उदाहरणे : हा शिपाई दहा जणांना भारी आहे.

६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.

उदाहरणे : आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..

समानार्थी : वजनदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका महत्त्व आदि अधिक हो या जिसमें गुरुता हो।

हमारी बात से गुरुजी की बात भारी है।
भारी, वजनदार, वजनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.