अर्थ : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.
उदाहरणे :
रामची रास कन्या आहे
समानार्थी : राशी
अर्थ : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.
उदाहरणे :
तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
समानार्थी : ढीग
अर्थ : गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा उत्सव.
उदाहरणे :
घरातल्या सर्व लोकांनी रासोत्सवात भाग घेतला.
समानार्थी : रासोत्सव
अर्थ : खळ्यातील धान्याचा ढीग.
उदाहरणे :
रास गोणीत भरले.
अर्थ : गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा एक प्रकारचा खेळ.
उदाहरणे :
गोपिका वा गोपी मिळून रास खेळत होते.
समानार्थी : रासक्रीडा