सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
Meaning of word salary from English dictionary with examples, synonyms and antonyms.

salary (noun)

Meaning : Something that remunerates.

Example : Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.

Synonyms : earnings, pay, remuneration, wage

मजदूर को मिलनेवाला पारिश्रमिक।

वह प्रतिदिन सौ रूपए मजदूरी लेता है।
उजरत, मजदूरी, मज़दूरी, मजूरी

वह धन जो किसी को कोई काम करते रहने के बदले में निश्चित अवधि पर दिया जाता है।

वह बहुत कम वेतन पर काम करता है।
तनख़ा, तनख़ाह, तनख़्वाह, तनखा, तनखाह, तनख्वाह, तन्ख़ाह, तन्ख़्वाह, तन्खाह, तन्ख्वाह, तलब, पगार, रातिब, वेतन, सेलरी, सैलरी

छापण्याची मजुरी.

प्रकाशक ह्या पुस्तकाची छपाई जरा जास्तच मागत आहे.
छपाई, छापणावळ

दुभत्या जनावराची धार काढण्याची मजुरी.

गवळ्याला उद्या दुहणावळ द्यायची आहे.
दुहणावळ

लादण्याची मजुरी.

मजुराने शंभर सिमेंटची लादणावळ शंभर रूपये मागत आहे.
लादणावळ

मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम.

तुला किती रोजगार मिळतो?
मजुरी, रोजगार

चुलाणात जाळण्याची मजुरी.

जाळणावळीचा हिशोब करणे तासभर चालू होते.
जाळणावळ

दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.

रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
घडण, घडणावळ

कांडण्याची मजूरी.

कांडण पायलीला दहा रुपये इतके होईल.
कांडण, कांडणावळ, सडणावळ

पिकाच्या आजूबाजूची निरुपयोगी झाडझुडूपे काढून टाकण्यासाठी दिली जाणारी मजूरी.

शेतकरी तणमोडणावळीचा हिशोब करीत होता.
तणतोडणावळ, तणमोडणावळ

पेरण्याची मजूरी.

तो आपली पेरणावळ घेण्यासाठी संध्याकाळी परत आला.
पेरणावळ

स्वयंपाक्याला स्वयंपाक करून दिल्याबद्दल द्यावयाचा मोबदला.

आनंदीबाई रांधवणावळ पुढच्या महिन्यात द्या म्हणाल्या.
रांधवणावळ

पुसण्याची मजुरी.

ती कामवाली बाई दिडशे रूपए पुसणावळ घेते.
गाडी पुसणावळ
धुणावळ याचा दर हल्ली वाढत आहेत.
पुसणावळ

वारवण्याची, उपणण्याची मजुरी.

एवढ्या धान्याची वारवणावळ तुम्ही किती घ्याल?
उपणणावळ, वारवणावळ

पकडण्याची मजूरी.

केवट माशाची पकडणावळ मागण्यासाठी ठेकेदाराकडे गेला.
धरणावळ, धरणी, पकडणावळ, पकडणी

भरण्याचे मोल.

प्रत्येक मजुराला पन्नास रूपये भरणावळ मिळते
भरणावळ, मजुरी

शेतात पाणी शिंपण्याची मजुरी.

ह्या शेताची शिंपणावळ किती घ्याल?
शिंपणावळ

लिहिण्याबद्दल द्यायचा मोबदला.

त्याने अजून लिहिणावळ दिली नाही.
लिखाई, लिहिणावळ

दळण्याची मजुरी.

मी दळणावळीचे पंधरा रूपये दिले.
दळण, दळणावळ, दळाई, पिसणावळ

रंग देण्याची किंवा रंगविण्याची मजूरी.

ह्याची रंगाई पन्नास रूपये घेईन.
रंगणावळ, रंगाई

छाटण्याची मजुरी.

मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
छाटणी

शिंपडण्याची मजूरी.

त्याने प्रति एकरी पन्नास रुपये शिंपडणी घेतली
शिंपडणी

एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.

शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
घडणावळ

कानसण्याची मजुरी.

रमाकांतला पन्नास रूपये कानसणी दिली.
कानसणी

धान्य झोडपण्याची मजूरी.

त्याने अजूनपर्यंत मला झोडपणी दिली नाही.
झोडपणी

एखादी वस्तू इत्यादी घालण्याची किंवा मांडण्याची मजूरी.

तो समारंभात पन्नास खुर्च्या मांडण्याची ५० रुपये मांडणावळ मागत होता.
मांडणावळ

नदीतून लोकांना पलिकडे नेण्याची मजूरी.

उतराई कमी करण्यासाठी काका प्रयत्न करत होते.
उतराई

झाळण्याची मजूरी.

मजूरी १०० रुपये झाळणावळ मागत आहे.
झाळणावळ

धुण्याची मजूरी.

परीट ह्या कपड्यांची पन्नास रूपये धुणावळ मागत आहे.
धुणावळ

लावण्याची मजुरी.

तो एका रोपाची लावणी वीस रूपये घेतो.
लावणी

झाडण्याची मजुरी.

ती बाई शंभर रुपये झाडणावळ घेते.
झाडणावळ, झाडणी

मढवण्याची मजुरी.

या दरवाजाला चांदी मढवायला पाच हजार रुपये मढणावळ पडली
मढणावळ, मढवाई

कामाचा मोबदला म्हणून, निश्चित कालावधीनंतर, मिळणारा आर्थिक लाभ.

तुला किती वेतन मिळते?
पगार, वेतन

शेत इत्यादी नांगरण्याची मजुरी.

शेतकर्‍याने पन्नास रूपये नांगरणी ठरवली होती.
नांगरट, नांगरणावळ, नांगरणी, नागरठ, नागरड

घासण्याची मजुरी.

त्याने भांड्याचे पन्नास रूपये घासणी घेतली.
घासणावळ, घासणी

खोदण्याची मजूरी.

मजूराने ५०० रुपये विहीरीची खोदणावळ मागितली.
खोदणावळ, खोदाई

विणण्याची मजूरी.

ह्या शालीला वीस रुपये विणणावळ पडली
विणणावळ

नाल लावण्याची मजुरी.

श्यामला दिवसभरात शंभर रुपये नालबंदी मिळाली.
नालबंदी

बांधण्याबद्दलची मजूरी.

ठेकेदाराने ह्या कामाच्या बांधणावळीचे हजार रुपये मागीतले.
बांधणावळ

गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.

सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
गुरचरण, गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा

कापण्याची किंवा तोडण्याची मजुरी.

मालकाने त्याला शंभर रुपये कापणावळ दिली.
कापणावळ, तोडणावळ

कातरण्यासाठी दिली जाणारी मजूरी.

मजुरांनी कातरणावळ वाढवून मागितली आहे.
कातरणावळ

खुरपण्याची मजुरी.

चंद्रू १०० रूपये नांगरणी मागत आहे.
खुरपणावळ, खुरपणी

हमालाची मजूरी.

हमाली देताना तो फारच काचकूच करत होता.
मजूरी, हमाली

चोपडण्याची मजुरी.

मजुरांनी चारशे रुपये चोपडणी घेतली.
चोपडण, चोपडणी


कापण्याची मजुरी.

सावकाराने पिकाची १०० रूपये कापणी दिली
कापणी

घुसळण्याची मजुरी.

मालकिणीनकडून आज घुसळणावळ मिळाली.
घुसळणावळ, मंथणावळ

रचण्याची मजूरी.

कारागीराने ह्या भिंतीची ५०० रुपये रचनावळ मागीतली आहे.
रचनावळ

शिवण्याची मजुरी.

अलीकडे कपड्यांची शिलाई खूप वाढली आहे.
शिलाई, शिवण, शिवणावळ