दुष्काळ (नाम)
अतिवृष्टी किंवा अनावृष्टी होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ.
धबधबा (नाम)
उंचावरून खाली कोसळणारा मोठा जलप्रवाह.
काजवा (नाम)
रात्री ज्याच्या पश्चभागी प्रकाश दिसतो असा एक किडा.
उशीर (नाम)
ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
जंगल (नाम)
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
अवलोकन (नाम)
बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
जाळे (नाम)
तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
कडोसरी (नाम)
कमरेस बांधलेल्या वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यात येणारा भाग.
संस्कृत (नाम)
ज्यात वेद,उपनिषदादी ग्रंथ लिहिले गेले ती भारतीय आर्यांची प्राचीन भाषा.
तलवार (नाम)
धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.