पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.

उदाहरणे : कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे

समानार्थी : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह इंद्रिय जिससे शब्द सुनाई पड़ता है।

नहाते समय मेरे कान में पानी चला गया।
कर्ण, कान, शब्दग्रह, श्रुति

The sense organ for hearing and equilibrium.

ear
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कानभर घालायचे एक कानातले.

उदाहरणे : तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान का एक आभूषण।

उसने दुकान से एक सुंदर कान खरीदा।
कान
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : श्रवणेंद्रियाचा चेहर्‍याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.

उदाहरणे : कुत्र्याने आपले कान टवकारले.

समानार्थी : कर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।

हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।
कान, बाह्य कर्ण
४. नाम / भाग

अर्थ : उचलता यावे म्हणून धरण्यासाठी बाहेरच्या बाजूस असलेला भांड्याचा भाग.

उदाहरणे : कपाचा कान तुटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बरतन को पकड़कर उठाने के लिए उसके बाहर की ओर बना दस्ता।

इस कप का हैंडल टूट गया है।
कान, हैंडल, हैण्डल, हैन्डल
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.

उदाहरणे : बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.

६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.

उदाहरणे : मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.

समानार्थी : काना, रंजक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।

मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।
कान, प्याली रंजकदानी, रंजक दानी, रंजकदानी
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.

उदाहरणे : बैलगाडीच्या धुर्‍याची खीळ कानातून निघाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.