पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळजी   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.

उदाहरणे : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.

समानार्थी : घोर, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।

मुझे दिन-रात यही चिंता लगी रहती है कि मैं इस काम को जल्द से जल्द कैसे खतम करूँ।
अंदेशा, अन्देशा, अवसेर, आध्या, चिंता, चिन्ता, धुन, धौजन, परवाह, फ़िक्र, फ़िराक़, फिकर, फिक्र, फिराक, सोच
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : योग्य काळजीमुळे वस्तू बर्‍याच दिवस टिकतात.

समानार्थी : जपणी, जपणूक, निगा, सांभाळ

३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : परिणाम वा प्रतिक्रिया यांविषयीचा विचार.

उदाहरणे : आगरकरांनी सुधारणेविषयीचे विचार मांडताना लोकमताची तमा मुळीच बाळगली नाही

समानार्थी : क्षिती, चाड, तमा, दरकार, पर्वा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम (विशेषतः अनुपयुक्त या अनुचित काम) करते समय मन को होनेवाला यह औचित्यपूर्ण विचार कि इस काम से बड़ों के मान को ठेस लगेगी।

आगरकरजी ने सुधार संबंधी विचार व्यक्त करते समय जनमत की परवाह नहीं की।
परवाह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.