पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चक्कर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बर्‍याच वेळा होणार्‍या येरझारा.

उदाहरणे : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले

समानार्थी : खेटा, खेप, खेपा, फेरी, येरझारा, हेलपाटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बार-बार आने-जाने की क्रिया।

तहसीलदार से मिलने के लिए बहुत फेरा लगाना पड़ा।
चक्कर, फेरा, फेरी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वर्तुळाकार फिरण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : सावज सावध झाल्यामुळे घारीच्या घिरट्या निष्फळ ठरल्या.

समानार्थी : घिरटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी गोलाकार मार्ग के किसी बिन्दु से चलकर तथा उसके चारों ओर घूमकर फिर उसी बिन्दु पर पहुँचने की क्रिया या भाव।

जेट एयरवेज के विमान को कई चक्करों के बाद सिग्नल मिला।
चक्कर
३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : एखाद्या कारणाने भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो आहोत असे वाटते ती शारीरिक स्थिती.

उदाहरणे : उन्हात फिरल्यामुळे त्याला घेरी आली.

समानार्थी : घेरी, झांज, झीट, भोंड, भोवंड, भोवळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शारीरिक अवस्था जिसमें किसी कारण से ऐसा आभास होता है कि सब कुछ गोल-गोल घूम रहा है या शरीर घूम रहा है।

कभी-कभी बिना खाए-पिए रहने के कारण भी चक्कर आता है।
चक्कर

A reeling sensation. A feeling that you are about to fall.

dizziness, giddiness, lightheadedness, vertigo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.