अर्थ : प्रचलित वा चालू होणे.
उदाहरणे :
हजार रुपयाची नवीन नोट निघाली आहे.
अर्थ : अनायासे वा सहज उच्चारण होणे.
उदाहरणे :
तिच्या मुखातून राम हा शब्द निघाला.
अर्थ : एखादे पुस्तक इत्यादी छापून लोकांपुढे येणे.
उदाहरणे :
त्यांचे कवितेचे एक नवीन पुस्तक निघाले.
समानार्थी : प्रकाशित होणे
अर्थ : लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे.
उदाहरणे :
बाटलीचे झाकण निघाले.
अर्थ : बाहेर येणे.
उदाहरणे :
माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.
समानार्थी : बाहेर येणे
अर्थ : प्रचारात येणे.
उदाहरणे :
एकोणिसाव्या शतकात अनेक वृत्तपत्रे निघाली.
अर्थ : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
उदाहरणे :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
समानार्थी : सुटणे