पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उडविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उडविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.

उदाहरणे : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.

समानार्थी : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.

उदाहरणे : तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.

समानार्थी : उडवणे, चालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।

पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।
किसान खेत में बैठी हुई चिड़ियों को उड़ा रहा है।
उड़ाना

Display in the air or cause to float.

Fly a kite.
All nations fly their flags in front of the U.N..
fly
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट हवेत वर नेणे.

उदाहरणे : तो मुलगा मैदानात पतंग उडवत आहे.

समानार्थी : उडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चीज हवा में उड़ सकती हो उसे हवा में उठाकर गति देना।

बच्चे छत पर पतंग उड़ा रहे हैं।
उड़ाना

Cause to fly or float.

Fly a kite.
fly
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.

उदाहरणे : तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.

समानार्थी : उडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झटके से अलग करना या काटकर दूर फेंकना।

सिपाही ने दुश्मनों के सर उड़ा दिए।
उड़ाना

Cut or remove with or as if with a plane.

The machine shaved off fine layers from the piece of wood.
plane, shave
५. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : खर्च करून टाकणे.

उदाहरणे : एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
त्याने सगळे पैसे उडवले.

समानार्थी : उडवणे, खर्च करून टाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खर्च कर देना या उड़ा देना।

इतना ही सामान ! सब पैसा खा गए क्या?
खाना

Spend extravagantly.

Waste not, want not.
consume, squander, ware, waste
६. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

उदाहरणे : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

समानार्थी : उडवणे, काढणे, गाळणे, वगळणे

७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : उडवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

उदाहरणे : शेतकर्‍याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.

समानार्थी : उडवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.