दिवाभीत (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
दालचिनी (नाम)
ज्याची साले वाळवून मसाला इत्यादीकरता वापरतात ते एक झाड.
लोहचुंबक (नाम)
लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करणारा दगड.
विलंब (नाम)
ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
केस (नाम)
डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू.
नवखा (नाम)
एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती.
बहिरा (नाम)
ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
मूठ (नाम)
शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग.
वीज (नाम)
ढगांच्या घर्षणाने उत्पन्न होणारी एक निसर्गशक्ती.
चरबी (नाम)
प्राण्यांच्या शरीरातील स्निग्ध पदार्थ.