अर्थ : एका गोष्टीच्या बरोबर दुसरी गोष्ट असण्याचा भाव.
उदाहरणे :
वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी.
अर्थ : शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग.
उदाहरणे :
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
समानार्थी : सांधा
अर्थ : जोडला जाणार तुकडा.
उदाहरणे :
घेर वाढवण्यासाठी ह्याला जोड लावावा लागेल.
अर्थ : जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण.
उदाहरणे :
खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.
समानार्थी : सांधा
अर्थ : एका माणसाने एकाच वेळी घालायचे कपडे.
उदाहरणे :
दोन दिवसासाठी दोन जोड ठीक आहे?
अर्थ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
उदाहरणे :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
समानार्थी : जोडी