अर्थ : दुसर्याने आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावे म्हणून देण्यात येणारे द्रव्य.
उदाहरणे :
गुंड आपापल्या क्षेत्रात खंडणी वसूल करतात.
अर्थ : सार्वभौम राजाला त्याच्या मांडलिकाने द्यायचा कर.
उदाहरणे :
हरपाल यादवाने खिलजीला खंडणी द्यायचे नाकारले.
अर्थ : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.
उदाहरणे :
अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.
समानार्थी : सोडणावळ
अर्थ : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.
उदाहरणे :
अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.
समानार्थी : सोडणावळ