दांडगाई (नाम)
मस्ती, धिंगाणा घालण्याचे काम.
आवळा (नाम)
बाहेरून सहा उभ्या रेषा असलेले एक तुरट फळ.
प्राणायाम (नाम)
योगशास्त्रानुसार श्वासाच्या गतीचा निरोध.
यती (नाम)
मनोविकारास ताब्यात ठेवणारा.
याग (नाम)
ज्यात हवन इत्यादी केले जाते तो धार्मिक कृत्याचा एक प्रकार.
डिंक (नाम)
बाभळ, खैर, शेवगा इत्यादी झाडांपासून निघणारा चिकट पदार्थ.
विश्वासू (नाम)
ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
घुबड (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
गजरा (नाम)
दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
धरित्री (नाम)
ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.