अर्थ : पदार्थाचे वस्तूमान मोजण्याचे एक एकक.
उदाहरणे :
तिच्या मुलाचे वजन दहा पाउंड आहे.
समानार्थी : पौंड
अर्थ : वीस शिलिंग किमतीचे सोन्याचे नाणे.
उदाहरणे :
पाउंडाची किंमत सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते.
अर्थ : आयर्लंडचे चलन.
उदाहरणे :
एक आयर्लंडी पंट म्हणजे शंभर पेनी होय.
समानार्थी : आयर्लंडी पंट, आयर्लंडी पाउंड, आयर्लंडी पौंड, पंट, पौंड
अर्थ : ग्रेट ब्रिटनचे चलन.
उदाहरणे :
एक ब्रिटिश पौंड म्हणजे जवळजवळ पंचाहत्तर रुपये.
समानार्थी : क्विड, पौंड, ब्रिटनी पाउंड, ब्रिटनी पाउंड स्टर्लिंग, ब्रिटनी पौंड, ब्रिटनी पौंड स्टर्लिंग, स्टर्लिंग पाउंड, स्टर्लिंग पौंड
अर्थ : इजिप्तचे चलन.
उदाहरणे :
एक इजिप्ती पौंड म्हणजे जवळजवळ आठ रुपये.
समानार्थी : इजिप्ती पाउंड, इजिप्ती पौंड, पौंड