अर्थ : प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जाणे.
उदाहरणे :
माझ्या चपला नदीत वाहून गेल्या.
अर्थ : श्रद्धेने देव, समाधी इत्यादीकांवर फूले इत्यादी अर्पण करणे.
उदाहरणे :
त्याने शंकरावर पाणी, अक्षता आणि फूले वाहिली.
अर्थ : वार्याचे गतिमान होणे.
उदाहरणे :
ह्या महिन्यात पाऊस आणणारा वारा वाहतो.
अर्थ : गतिमान होणे.
उदाहरणे :
कोरड्या मातीपेक्षा पाणी असलेल्या जमिनीतून वीज लवकर वाहते.
अर्थ : विपत्ती, कष्ट इत्यादीत गुजराण करणे.
उदाहरणे :
आयुष्याचा भार आता वाहिला जात नाही.