अर्थ : चीजेचे किंवा बंदिशीचे पूर्वांर्ध.
उदाहरणे :
बंदिशीची स्थायी ही सामान्यतः मध्य सप्तकात असते
अर्थ : भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाच्या निष्पत्तीला आधारभूत मानलेल्या चित्तवृत्तींपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय असे सात स्थायीभाव भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.
समानार्थी : स्थायीभाव
अर्थ : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
उदाहरणे :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
समानार्थी : कायमस्वरुपी, चिरंतन, चिरस्थायी, शाश्वत