अर्थ : चांगले गुण.
उदाहरणे :
विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण यावेत हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असते
समानार्थी : सद्गुण
अर्थ : औषधोपचार किंवा मंत्रोपचार ह्यांचा चांगल्या स्वरूपाचा परिणाम.
उदाहरणे :
ह्या औषधाने लगेच गुण आला.
अर्थ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
उदाहरणे :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
समानार्थी : मार्क
अर्थ : न्याय व वैशेषिक ह्या दर्शनांत वर्णिलेले चोवीस गुण.
उदाहरणे :
रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु