अर्थ : वरून खाली वा दुसर्या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे.
उदाहरणे :
पारिजातकाखाली फुलांचा सडा पडतो.
अर्थ : लाक्षणिक अर्थाने इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.
उदाहरणे :
नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे.
उदाहरणे :
शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.
समानार्थी : राहणे
अर्थ : कमी होणे वा उतरणे.
उदाहरणे :
काल संध्याकाळपासून वारा पडला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूचा दुसर्या वस्तूत अचानकपणे प्रवेश होणे.
उदाहरणे :
तुपात मुंग्या पडल्या.
अर्थ : वरून खाली येणे.
उदाहरणे :
तो घरावरून पडला.
किल्ल्यावरुन दगड खाली पडला.
अर्थ : आळसाने निजणे वा सुस्त होणे.
उदाहरणे :
येथे का पडलास कामावर जा.
तो दिवसभर घरीच पडून असतो.
समानार्थी : पडून असणे
अर्थ : पृथक वा वेगळे होणे.
उदाहरणे :
त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.
समानार्थी : तुटणे
अर्थ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
उदाहरणे :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
समानार्थी : येणे, हस्तक्षेप करणे
अर्थ : आवश्यकता वा गरज असणे.
उदाहरणे :
आपल्याला काय पडली आहे, त्यांचे ते बघून घेतील.
अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
उदाहरणे :
कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
समानार्थी : पडून असणे
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
उदाहरणे :
मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
समानार्थी : पहुडणे
अर्थ : किंमत द्यावयास लागणे.
उदाहरणे :
तुला ही कार कितीत पडली.
अर्थ : जमिनीवर पालथे होणे.
उदाहरणे :
माफी मागण्यासाठी तो माझ्या पायावर पडला.
अर्थ : पडण्याची क्रिया.
उदाहरणे :
छतावरून त्याचे पडणे कुणीही पाहिले नाही.